Monday, June 1, 2015

'संघर्ष' कोठे ढेपाळला?

* 'यापूवीं ठाणे शहरातील उत्सवांना रस्त्याच्या एकूण रुंदीपैकी निम्म्या जागेत मंडप उभारण्याची परवानगी दिली जात होती. पाचपाखाडी भागात तर 'संघर्ष'चा मंडप संपूर्ण रस्ता व्यापत असे.
* 'मात्र, न्यायालयाने उत्सवांच्या आयोजनाबाबत कठोर भूमिका स्पष्ट केल्यानंतर ठाणे महापालिकेने नुकतीच नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार एकूण रस्त्याच्या एक चतुर्थाश भागातच मंडप उभारण्याची परवानगी देण्यात आली.
* 'आव्हाडांचा उत्सव ज्या रस्त्यावर साजरा होतो, त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी १५ मीटर इतकी आहे. नव्या नियमानुसार, त्यांना केवळ पाच मीटर रुंदीचा मंडप उभारण्याची परवानगी होती.
* 'याशिवाय दहीहंडीच्या उंचीवरील र्निबध आणि बालगोविंदांवरील बंदी यामुळे उत्सवातील भपकेबाजपणा कमी होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर 'संघर्ष'ला दहीहंडी उत्सवच रद्द करण्याची वेळ आली.