Monday, December 27, 2010

कळत नाही


कळत नाही या वाटेवर
अस एकट किती वेळ चालायच?
जे नव्हतेच आपले कधीही
त्यांना का आपल मानायाच?
ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा
त्यांवर विसंबून तरी का रहायच?
ग्रिश्माने होरपळलेल्या मनाने
पुरालाच का चांगल मानायाच?
आहेत शब्द आपणा पाशी पण
इथे नाहीत कुणालाच कान
तेव्हा मनातल्या भावनांना
फ़क्त कागदावरच स्थान द्यायच?
की आपलच कुठेतरी चुकतय
अस मानून गप्प रहायच?
नाही सापडत ना उत्तर
म्हणुन प्रश्न्नानकड़ेच दुर्लक्ष करायच?
की आपणही एक प्रश्नचिन्ह
बनुनच रहायच?

No comments:

Post a Comment