Monday, June 27, 2011

अशी असावी माझी प्रियेसी ...

भ्रमरासारखी गुंजन करणारी ,
गप्प राहा अस म्हणुन ही बडबड करणारी ,
मनातल तिच्या निरागसपणे  बोलणारी ,

सतत हसणारी अन दुस-यांना हसवणारी ,
दूर राहूनही माझ्याशी जवळीक निर्माण करणारी ,
तिच्या प्रेमाने मला मोहून टाकणारी ,

तिच  माझ्यावरच प्रेम पाहून दुस-यांना हेवा वाटेल अस राहणारी ,
वसंतातल्या श्रावणाप्रमाणे  भासणारी ,
अन मुसळधार पावसात प्रणयधुंद होणारी ,

माझ्या मनातल ओळखून मला समजणारी ,
माझ चुकलेल पाऊल सावरणारी ,
माझ्या बडबडीवर रागावणारी अन हसणारी ,

माझ्या डोळ्यातून वाहणार पाणी तिच्या ओठाने टिपणारी ,
आपलस करून सोबत चालणारी ,
सुख दू:खात सावलिप्रमाणे राहणारी ,

अशी असावी माझी प्रियेसी ...
एवढं सगळे गुणं "असणारी"सापडणे कठीणयं हो!
पण शोधात आहे.तुम्हाला कोठे सापडली तर मला कळवा लगेचं...

No comments:

Post a Comment